
सकाळी उदघाटन समारंभ अन् संध्याकाळपर्यंत सिंमेट रस्त्याचे काम पूर्ण.
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम वडोद तांगडा
भोकरदन,
माननीय केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री .श्री रावसाहेब पाटील दानवे . (भारत सरकार) आणि जलसम्राट मा.श्री आमदार संतोष पाटील दानवे तथा जिल्हा अध्यक्ष. यांच्या नेत्तुत्वातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडखवाडी या रस्त्यासाठी आमदार फंडातून पंचवीस पंधराचे काम 5 लक्ष रूपयांचे मंजूर करून तत्काळ कामास सुरूवात करण्यात आली आहे.
वडोद तांगडा येथिल खडकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था झाली होती अनेक वर्षांपासून हा रस्ता पाणदं होता शाळेत जाण्यासाठी मुलांना प्रचंड चिखल तुडवत शाळेत जावे लागत होते .शैक्षणिक वर्षात विद्यार्थींचं नुकसान होऊ नये ,योग्य वेळी मुलांना शाळेत जाताना कुठलाही त्रास होऊ नये ही गोष्ट लक्षात घेऊन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी येथे जाणारा रस्ता हा तत्काळ सकाळी उदघाटन समारंभ सोहळा पार पडला व संध्याकाळ पर्यंत सिंमेट रस्त्याचे काम पूर्ण झाले.
रस्त्याची काम पूर्ण झालेलं बघून पालक वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
उदघाटन समारंभ प्रसंगी उपस्थित गजानन भास्कर तांदुळजे ,माजी सरपंच कृष्णा पाटीलबा तांगडे , तथा सोसायटीचे चेअरमन, भाजपा बुथ प्रमुख. गोपाल येडूबा तांगडे , शालेय समिती अध्यक्ष,शिवाजी जगताप , शक्ती केंद्रप्रमुख तुळशिराम तांगडे, ZP शालेय समिती अध्यक्ष मनोहर पवार संग्रामसिंग मुराडे,विजय तांगडे, ग्रा.सदस्य ,विष्णू संपत तांगडे,अनिल तांगडे, , विठ्ठल तांगडे, साहेबराव दानवे,गजानन तांगडे,कृष्णा तांगडे .सुभाष साळवे,आदीची पालक उपस्थिती होती.