
दै.चालु वार्ता
अंबाजोगाईप्रतिनिधी किशोर फड
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्जरी विभागप्रमुख श्री डाॅ. नितीन चाटे सर व सर्व अधिकारी वर्गाच्या बहुमोल मेहनतीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय राज्यात मुंबईच्या JJ HOSPITAL व इतर महाविद्यालय रुग्णालयांना मागे टाकत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
गोर गरीब रूग्णांना मदत करण्यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अव्वल……वरीष्ठ डॉक्टर्स ची रिक्त पदे,तुटपुंजा स्टाफ या परिस्थीतीत ही हॉस्पिटल ची उत्तम कामगिरी .
ग्रामिण भागातील तालुक्याच्या ठिकाणी असलेले अवघ्या 500 बेड अंबाजोगाईचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचे इथले काम पाच वर्षांपासुन सर्वोत्कृष्ट राहीलेले आहे.
त्याचसोबत विविध विभागांच्या एकुण शस्त्रक्रिया , निधी खर्चाच्या बाबी यांचा एकुण लेखाजोखा घेणाऱ्या क्रमवारीत स्वाराती रुग्णालय राज्यात सर्वप्रथम आले आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे सर, माजी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख सर, महात्मा फुले जीवनदायी योजनेचे प्रभारी डॉ. नितीन चाटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राकेश जाधव, सर्व डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी यांचे अंबाजोगाई व पंचक्रोशीतून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अंबाजोगाईतील व सर्व रुग्णांची अशीच सेवा आपल्या सर्व डॉक्टरांच्या हातून उत्तरोत्तर चांगली होत राहो अशी अपेक्षा सर्व अंबाजोगाई करांच्या वतीने होत आहे…