
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- येथील परफेक्ट प्रायमरी इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ , मृदुंगाच्या गजरात व भगव्या पताका हाती घेत विठु नामाचा गजर करीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक,मुख्य रस्ता आदी ठिकाणी रिंगण सोहळा देखील संपन्न झाला या दिंडी सोहळ्याने अवघा परिसर विठू नामाच्या भक्तिरसात न्हावुन निघाला होता. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठल रखुमाई च्या जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त मौजे पेठवडज येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री. गोविंदराव केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका
व शिक्षकांनी या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. सुरूवातीला पालखीमधील विठ्ठल रुक्माईच्या मूतींचे संचालक श्री. गोविंदराव केंद्रे सर व मुख्याध्यापिका अनुराधा पवार,व रेखाताई पांचाळ यांच्या हस्ते पुजन करण्यात आले व भव्य मिरवणूक रुपी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला तबला धारक विद्यार्थी त्यानंतर तुळस डोक्यावर घेतलेल्या विद्यार्थीनी, भगवे ध्वजधारी विद्यार्थी , भगवा व गणवेशातील वारकरी विद्यार्थी, त्यांच्या सोबत शिक्षक वृंद ,हा दिंडी सोहळा बघण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, महिला व पालकांनी मोठी गर्दी केली होती.