
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी
वासू पाथरे
अमरावती (चिखलदरा) : तालुक्यातील डोमनबर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दि.०३ जुलै २०२३ सोमवार रोजी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
याबाबत वृत्त असे की,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमनबर्डा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला शाळेत गुरुपूजन कार्यक्रम करून शिक्षकांचे आशीर्वाद घेतले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश झेंगुजी तोटे,शिक्षक शिवकुमार पटवे,अंगणवाडी सेविका हेमरती शिंगसारवे व आरोग्य सेविका संगीता पाथरे उपस्थित होते.