
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (तिवसा) : संविधानाचा खेळखंडोबा करणारी खिचडी सरकार फार काळ टिकूचं शकणार नाही अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आ.ऍड.यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या चितेची आग अद्यापही पूर्णपणे थंड झाली नाही आणि त्यावेळेस घातलेला हा सत्तेचा गोंधळ सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी घातला.इतके असंवेदनशील असूच कसे शकतात याची कल्पना देखील करू शकत नाही.हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे.
महाराष्ट्रात संविधानाची तोडफोड सातत्याने होत आहे.हे सहन करण्यासारखे नाही.आम्ही संविधानाचा मान राखला जावा याकरिता आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन देतो की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनहिताचे काम सातत्याने करत राहू.आम्ही काँग्रेस पाईक असून आम्ही आमच्या शब्दावर कायम पक्के आहोत.आम्ही जनमताच असा अपमान कदापी करू शकत नाही आणि ह्या सत्तेला काही तथ्य असून ही खिचडी सरकार फार टिकू शकणार नाही असे असे सुद्धा आ.ऍड.यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर शब्दास्त्र सोडले.