
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा – सिध्दार्थनगरच्या मदतीला दिपक पाटील कानवटे धावले स्वखर्चातून मोठ्या नाल्याचा गाळ जेसीबी लावून काढले त्यामुळे येथील जनतेने त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
लोहा शहरातील मागासवर्गीय एरिया असलेल्या सिध्दार्थ नगर मधुन एक मोठा नाला गेला आहे या नाल्यात , तलाठी काॅलनी , शिक्षक काॅलनीचे पाणी सालाचे बारा महिने वाहते व पावसाळ्यात या मोठ्या नाल्यात तलाठी काॅलनी, शिक्षक काॅलनीसह बैल बाजार व माळावरचे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहते तर अनेकवेळा मोठा मुसळधार पाऊस पडल्यानंतर या नाल्याला मोठा पुर येतो व या पुराचे पाणी या नाल्याच्या काठावर घरे असलेल्या गोरगरिब नागरिकांच्या घरात जाऊन त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यांचे संसार उपयोगी साहित्य , अन्न धान्य एखाद्या वेळेस वाहुन जाते आता पावसाळा सुरू झाल्यामुळे या नाल्याच्या काठावरील घरांना या नाल्यातील पुराच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला होता तेव्हा
लोहा येथील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे शिवसंकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिपक पाटील कानवटे यांनी या भागाला भेट देऊन या नाल्याचे काम स्वखर्चातून जेसीबी मशीन लावून केले यामुळे येथील नागरिकांमधून दिपक पाटील कानवटे यांचे आभार मानुन समाधान व्यक्त होत आहे.