
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
हरीत क्रांतीचे जनक कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी लोहा तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांचा जिल्हा कृषि विभाग नांदेड यांच्या वतीने प्रमाणपत्र, सम्मान चिन्ह रोख रक्कम देऊन सम्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र शासन 2022 पिक स्पर्धा सोयाबीन मध्ये विभागातून हेक्टरी 58 क्विंटल 90 किलो उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्याला बहुमान मिळवून दिल्याबद्दल जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा कृषी कार्यालय नांदेड या दोन्हीही विभागाने आज जिल्हा परिषद यशवंतराव सभागृह नांदेड येथे शेतकरी दिनानिमित्त व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी सायाळ येथील प्रगतीशील शेतकरी रत्नाकर पा ढगे यांचा शाल , श्रीफळ , वृक्ष प्रमाणपत्र , रोख रक्कम , देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पांडागळे , केवीके पोखरणीचे देविकांत देशमुख , आत्म्याच्या माधुरी सोनवणे , कृषी भुषण वनश्री भूषण डॉ स्त्रीरोग तज्ञ शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर लोहा तालुक्यासह राज्यभरातून त्यांना कृषी कार्याविषयी शुभेच्छा देण्यात आल्या.