
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा शाम पुणेकर
पुणे : सध्या पुण्यामध्ये ऑनलाईन सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. रोज एकतरी गुन्हा घडतोच.
काल पुण्यामध्ये भामट्याने एका व्यावसायिकाला सव्वा कोटी रुपयाला टोपी घातली.
‘ऑनलाइन पध्दतीने उत्पादनाची विक्री करणाऱ्या एका प्रसिध्द कंपनीचा मी वितरक आहे ‘ असे सांगून विश्वास संपादन करीत एका व्यवसायिकाची सुमारे १ कोटी २० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरजेचा एक भामटा चैतन्य उर्फ अंकित भाऊसाहेब पाटील, वय ३४ रा. कळंबी, ता. मिरज सांगली याच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यवसायिकाची आरोपी चैतन्य ह्याच्याशी नुकतीच ओळख झाली होती. गृहोपयोगीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कंपनीकडून स्वस्त दरात मिळवून देतो असे चैतन्याचे आमिष दाखविले. सांगली जिल्ह्यात अनेकांना मी स्वस्तात माल दिला असे त्याने सांगितले होते.
आरोपीने सुरवातीला लॅपटॉप, मोबाईल संच तसेच सराफाकडील सोने अशा सरुवातीला १८ लाख रूपयांचा माल स्वस्तात घेवून दिला. त्यावर व्यवसायिकाचा विश्वास बसला. नंतर त्याने हळूहळू खरेदीसाठी पैशांची मागणी करीत अद्याप पर्यंत १ कोटी २० लाख रुपये व्यापा-या कडून आगाऊ रक्कम घेतली व लवकरच माल पुरविते असे सांगून गेला.
व्यापाऱ्याने त्याला वस्तू आणून दे असे वारंवार सांगितले पण त्याने नंतर थापा मारून उडवाउडवीची उत्तरे दिली
आणि संबंधित माल आणून दिला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे व्यवसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने चैतन्य विरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत…