
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी हाणमंत सोमवारे
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई दक्षिण येथे हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली… कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी देवकते, नागनाथ चेवले,शिवाजी बारोळे, उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड , निवृत्ती शिवणे यांनी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या बद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर शालेय परिसरतील जागेमध्ये प्रति विद्यार्थीनी वृक्षारोपण एक आदर्श निर्माण करुन दिला आहे, नंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तंजिला शेख या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार संदीप कोटापल्ले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मुजाहिद व चव्हाण रुस्तुम यांनी प्रयत्न केले.