
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा शाम पुणेकर
पुणे : एनआयए ने पुण्यातील काही ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलीस आणि एनआयए ने संयुक्तपणे पुण्यात आज सकाळपासून ही कारवाई करून काही पुरावे गोळा केल्याचे काम केले अशी माहिती मिळत आहे. आयएसआयएस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून आयएनआय ने चौघांना अटक केली. तसेच मुंबई, भिवंडी, या ठिकाणीही छापे टाकले आहेत. ही देशातील सर्वात मोठी कारवाई मानली जात असून आयएसआयएस शी संबंधित असणाऱ्या चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे चारही जण रडारवर होते. कारवाई दरम्यान आरोपींकडून आणि त्यांच्या घरातून डिजीटल उपकरणे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
संशयानुसार आज पहाटे कोंढव्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वजीर कोस्कड सोसायटीमध्ये आयबी पथकाकडून छापेमारी करून जुबेर शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे…