
दै.चालु वार्ता
नांदेड शहर विशेष प्रतिनिधी प्रा.विजयकुमार दिग्रसकर पेरणी सुरु
यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात शेतकर्यां साठी तशी निराशाजनकच झाली. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र कोरडेच गेले. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार सुरुवात झाली .
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला थोडासा पाऊस पडला पण नंतर पावसाने चांगलेच डोळे वटारले त्यामूळे सर्व रानं काळेभोर आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोयहोती त्यांनी कापसाची लागवड केली तर काहींनी पाऊस पडेल या आशेवर कोरड्या रानात सोयाबीन टाकले. पावसाने उघडीप दिल्यामूळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्यापुढे उभे राहिले आहे. पण सुरु झालेल्या वरुणराजाच्या दमदार एन्ट्री मूळे बळीराजा सुखावला असून पेरणीची लगबग सुरु झाली आहे.