
वाढदिवस स्वीय साहायक सातलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी अनाथ,दिव्यांग विद्यार्थ्यांना व वृद्धाश्रमात केले खाऊ वाटप…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधि उमरगा/तुळजापूर
शिवराज पाटील
उमरगा :- प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने उमरगा शहरात आ.बच्चू कडू यांचे स्वीय साहायक सातलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांनी दि 5 जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.दरम्यान बच्चू भाऊंच्या आदेशानुसार कुठेही केक कापण्यात आला नाही.सर्वप्रथम तालुक्यातील एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद शाळेला भेट देऊन येथील सर्व विद्यार्थ्यांना फळ आणि गोडधोड (लाडू) आदी खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी आ.बच्चू कडू यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना येथील सर्व दिव्यांग अनाथ विद्यार्थी करताना दिसून आले. सातलिंग स्वामींनी सर्व विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारताना दिसून आले यावेळी या अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य खुलले होते.यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यानंतर उमरगा चौरस्थास्थित गुलबर्गा रोड लागत असलेल्या इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्राला भेट देऊन सर्वांसाठी भेट स्वरूपात फळ वाटप करण्यात आले आणि येथील वृद्धाची सातलिंग स्वामी जिव्हाळापूर्वक मोठ्या आत्मीयतेने विचारपूस करताना दिसून आले. यावेळी इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र व्यवस्थापक प्रा मारुती खामीदकर, अस्मिता विश्वास्थ मंडळाचे सचिव प्रा अभयकुमार हिरास उपस्थित होते.या उपक्रमात प्रहार संघटनेचे अजीम महमद खजुरे,राम हांडगे,गौरीशंकर हविनाले व इतर कार्यकर्ते उपस्थिती होते.शेवटी हे शहरातील शासकीय विश्रामगृहात “संवाद आपल्या लोकांशी” हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.उमरगा लोहारा तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनीं उपस्थित होते.या कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या लागलीच सोडवण्यात आल्या यामध्ये आवर्जून उपजिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग बांधवाना येणाऱ्या अडचणीवर संबंधित अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधून तात्काळ सोडवण्याबाबत सातलिंग स्वामींनी पुढाकार घेतला…