
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रामेश पंडित
लातूर:- लातूर जिल्ह्यातील पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या ढाळेगाव येथे सुमारे ३५० वर्षापासून सुरू असलेला हा आषाढी सोहळा यंदाही अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .आषाढी एकादशी पासून या सोहळ्यास सुरुवात झाली दररोज वारकरी सांप्रदायाचे व वैराग्याचा प्रतीक असलेली भगवी पताका घेऊन गाव प्रदक्षिणा मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली दररोज हरिपाठ काकड आरती भजन कीर्तन हे कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांची पालखी मिरवणूक अगदी भव्य स्वरूपात हजारो भाविक भक्त वारकरी वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात निघाली पंचक्रोशीतील भाविक या आषाढी यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहतात श्री संत नारायणजी अप्पा महाराज हे विठ्ठल भक्त असल्याने आषाढी पाची वारी नित्य नियमाने करायचे परंतु आयुष्याच्या शेवटी वार्धाक्यामुळे नारायणजी अप्पा महाराज यांना पंढरपूरच्या पायी वारीला जाणे शक्य होत नव्हते म्हणून पंढरपूरचे विठ्ठल स्वतः आपल्या भक्ताला दर्शन देण्याकरीता मेघरूपात व वर्षा रुपात आषाढ पौर्णिमेला हजर राहण्याचे वचन दिले तेव्हापासून प्रत्येक वर्षी न चुकता नारायणजी अप्पा महाराजांची पालखी निघाल्यास न चुकता पाऊस येतो अशी अध्यायिका पिढी दर पिढी पुढे चालत आली आहे श्री संत नारायणजी आप्पा महाराज संस्थांनचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग कदम व गावकऱ्यांकडून येणाऱ्या भक्तांसाठी चहा फराळ इत्यादी सोय केली जात असते यात्रा शांततेत पार पडावी याची मंदिर समितीकडून विशेष काळजी घेतली जाते पंचक्रोशीतील भक्ताबरोबरच दर्शनासाठी आजी माजी आमदार माजी मंत्री विविध पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थित पाहण्यास मिळते येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत मंदिर समितीचे कार्यवाहक नामदेव महाराज कदम यांनी केले व सर्वांना या आषाढी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या…