
वसंत खडसे
उपसंपादक वाशिम दै. चालु वार्ता
वाशिम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाशिम युवक जिल्हाध्यक्षपदी गोपाल संतोष खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व मा. रविकांतजी तुपकर यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांनी नियुक्तीपत्र देऊन गोपाल खडसे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
गोपाल खडसे यांची समाजसेवेची आवड, कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक तळमळ, व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आदींच्या बळावर त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, संघटनेचे कार्य तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवून सर्व शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी गोपाल खडसे सदैव तत्पर राहतील. या अपेक्षेतून त्यांची वाशिम युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे, विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.
” आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या कडे सत्ताधाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात, शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी प्रमाणिकपणे करणार आहे.
गोपाल संतोष खडसे
( नवनियुक्त, युवक जिल्हाध्यक्ष वाशिम )