
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:एकात्मिक बाल विकास प्रकल्प देगलूर च्या माध्यमातून अंगणवाडी मदनीस च्या पद भरती प्रकिया च्या जागा निघाल्याने महिलावर्गाची फसवणूक करण्यासाठी पंचायत समिती देगलूर च्या परिसरात दलाल वर्ग चांगलाच सक्रिय झाला असून या मध्ये भोळ्या भाबळ्या महिलांची फसवणूक होऊन आर्थिक बसण्याची चिन्ह दिसत आहे. अंगणवाडी मदतनीस च्या पदभरती निघाल्याने तालुक्यातील महिला वर्ग नोकरी मिळण्याच्या आशेने फार्म भरत आहेत, या महिलांना भुरळ घालून काही सक्रिय दलाल वृत्तीचे व्यक्ती या महिलांना तुम्हाला नोकरी प्रयत्न करीत आहे. काही वेळासाठी या महिलांच्या समोर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी ओळखी आहे साहेब आमच्या शब्दा बाहेर जात नाही तुमचं सिलेक्शन नक्की होईल असे दर्शवून खोटारडे आश्वासन या महिला वर्गना देऊन त्याच्या कडून जमेल तेवढी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात हे दलाल टपून बसले आहेत, त्यामुळे या दलाल वर्गावर नियंत्रणासाठी व या मध्ये कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प देगलूर च्या माध्यमातून या मदतनीस भरती प्रक्रिये बाबत सावधानी बाळगत दलाल प्रवृत्ती च्या व्यक्ती शी कोणताही पैश्याचा व्यवहार न करण्याकरिता जाहिरात काढून ती जिथे मदतनीस च्या जागा निघाल्या आहेत तेथील ग्राम पंचायत मध्ये लावली सुद्धा आहे. पण भरती प्रक्रिये मधील अर्जदार महिला या जाहिराती कडे परस्पर दुर्लक्ष करून सक्रिय दलाला च्या मार्फतीने फार्म प्रक्रिये साठी प्रयत्न करीत आहेत. या महिलांच्या माहिती साठी असे नमूद करावसे वाटते की कोणताही दलाल तुम्हाला नोकरी लावून देऊ शकत नाही तुम्हाला परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या गुणवत्ते च्या आधारावर तुमची निवड होईल या साठी कोणत्याही दलाल वर्गाला याचं श्रेय जाणार नाही. जर या महिलांना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळाली तर दलाल वर्ग पुन्हा आम्ही प्रयत्न केले म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली असे भासावत असतात. आणी मग या साठी पैश्याची मागणी या दलाल वर्गाकडून होत असते. पण निश्चितच या साठी कोणत्याही दलाला एक रुपया देण्याची गरज नाही. कारन ज्या दलाला कडून तुम्ही लागण्याची अपेक्षा करता ते सर्व फ्फोल आहे, जर मार्क कमी असले तर दलालांनी कितीही आपटली तरी तुम्ही घेऊनच आपला फार्म टाकावा. कोणत्याही दलाला च्या भुलथापा ना बळी पडून महागाई च्या काळात आपलं आर्थिक नुकसान करू नका असे वारंवार सांगून सुद्धा दलाल वर्गाच्या आशेने आपल्याला नोकरी मिळेल या उद्देशाने या सक्रिय दलाल च्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे. त्या मुळे पदभरती बाबत उमेदवारांना गोर गरीब महिलांना या सक्रिय दलाल वर्ग कडून अर्थीक फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की तरी पण सावधगिरी म्हणून फसवणूक करीत असलेल्या अश्या दलाल प्रवृत्ती च्या व्यक्ती पासून सावध असणे गरजेचे आहे. आणी या साठी कोणालाही पैसे बाबत व्यवहार करू नये.
लावून देतो अश्या भुलथापा देण्याचा सुनिल गेडाम / मुख्य पत्रकार ही नोकरी मिळवू शकत नाही हे लक्षात
अंगणवाडी मदतनीस भरती प्रकिया नी निपक्ष रित्या पार पडेल, व यासाठी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी कोणताही पैश्याचा व्यवहार करू नका आपली फसवणूक करून घेऊ नका.
असे बाल विकास प्रकल्प अधिकारी देगलूर यांनी आव्हान केले आहे…