
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड
अखेरचा हा दंडवत तुम्हा अखेरचा दंडवत…..भावपुर्ण श्रद्धांजली…..!
सोडून गेले तुम्ही नाव आणि गाव,
दरीखो-यातून मावळेल तुमचे नाव,,
शिवाय तुमच्या आता सांगा घ्यावी कशी धाव…..?
वाटेल तुमची गरज जेंव्हा आता आम्ही कुठे तुम्हा पाहावं…..??
वाटले नाही का तुम्हास आसे अचानक सोडून कस जाव…..???
काल अत्यंत दुःख देणारी घटना घडली. जीच्यावरती काही केल्या अजुनही विश्वास बसत नाहीये. खापरटोनसह बारावाड्यांचा आत्मा श्री.चंद्रकांत चाटे यांचे काल सकाळी दुखःद निधन झाले.
एक बहुआयामी-कुशल अत्यंत प्रेमळ, सदैव हसतमुख आणि बोलके नेतृत्व-व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची धर्मापुरीच्या भोवतालच्या ४० खेड्यांसह अंबाजोगाई-परळी तालुक्यात एक आपुलकीची ओळख होती. सरकारी नोकरी करीत असतानाही आणि निवृत्ती नंतरही जनतेची सेवा करत, आपल्या नात्यागोत्यातील गरीब-श्रीमंत प्रत्येकाचा समसमान आदर करत ज्यांनी आपले जीवन आदर्शवत जगले. जे मिळाले तेवढे आयुष्य जशास तसे जगले.
आपल्या मुलांना अगदी दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना उच्चपदस्थ बनवून सुनाही त्याच तोडीच्या शोधून त्यांचा संसार थाटून सर्वांना अगदी सक्षम करुन मुलं-बाळांसह आपल्या कुटुंबाला एक परिपक्व परिवार म्हणून ओळख करून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. अशा उत्तम-आदर्शवत परिवाराची निर्मिती करुनही ते निवृत्तीनंतरही क्षणभरही विश्रांती न घेता, मुलांच्या जीवावर आता ऐषोआरामात जगुयात असा विचार न करता शेती, आपली गुत्तेदारी आणि त्यांचा आवडता छंद राजकारण हे सारं अगदी चांगल्या पद्धतीने करत होते.
परंतु म्हणतात ना की…..,
“देवाजीच्या आले मना, पुढे कोणाचे चालेना….!”
याप्रमाणे देवाला चांगली माणसे लवकर लागतात असे म्हटले जाते. अगदी त्याच धरतीवर ईश्वराने आज चंद्रकांतजी चाटे यांना अचानक उचलणे त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि नातेवाईकांसाठी अतिशय दुःखाची बाब आहे.
काल दि.5/7/2023 वार बुधवार पहाटे सकाळी 5 वा. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दि.6/7/2023 वार गुरुवार सकाळी ९.०० (नऊ) वा. अंत्यविधी खापरटोन ता.आंबेजोगाई या त्यांच्या मूळ गावी होणार आहे.
“विधी का विधान कोई नही टाल सकता” मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते सर्वांना मान्यच करावे लागते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून सर्वांना ते मोठ्या दुःख सागरात बुडवून गेले आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या जाण्याचे दु:ख सहन करण्याची ताकत कुटुंबीयांना देवो. हीच संपुर्ण शोकाकुलांच्यावतीने ईश्वर चरणी मनोभावे प्रार्थना……!!!.