दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा, शाम पुणेकर
पुणे: पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डि वाय पाटील महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले.
शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात प्रशासनानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. ते का लावण्यात आले याचे कारण अजूनही समजले नाही. तसेच शाळेचे मुख्याध्यापक कोट्स अलेक्झांडर यांनी हिंदू मुलांकडून ख्रिश्चन प्रार्थना म्हणवून घेतली. ह्या दोन्ही घटना धक्कादायक व संताप निर्माण करणाऱ्या आहेत. संतापलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व पालकांनी त्या मुख्याध्यापकला त्याचे कपडे फाटेस्तोवर पळू पळू बेदम मारहाण केली.
पुढील कारवाई व तपास चालू आहे.
