
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील येथील दादाहरी अशोक वनवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल पाथरूड,आनंदवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आनंदवाडी सारख्या ग्रामीण भागातून जाऊन जिद्द,चिकाटी व संघर्षाच्या जोरावर दादाहरीने हे यश संपादन केले निश्चितपणे इतर विद्यार्थ्यांना आदर्शवत आहे.आपल्या परिसरातील अनेक युवक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत असल्याने परिसराचे नक्कीच नाव उंचावत आहे.याचा सार्थ अभिमान या निमित्ताने वाटतो.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा युवासेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.चेतन बोराडे,सरपंच शिवाजीराव तिकटे,उपसरपंच प्रा.तानाजी बोराडे,युवा उद्योजक भाऊसाहेब बोराडे, भरत दादा बोराडे,बापू वनवे,दशरथ वनवे, बिभीषण तिकटे, शंभू मनगिरे आदी उपस्थित होते.