
अंजनगाव सुर्जी शहरात वारंवार नागरिकांना दूषित पाणी पुरवठा…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरात वारंवार प्राधिकरण कार्यालयाच्या अभियंत्यांना नागरिकांनी सुचित तसेच तक्रारी करून सुद्धा वेळोवेळी दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केल्या जात आहे.तर बऱ्याच परिसरात पाणी पुरवठाचं होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.प्राधिकरण कार्यालय नागरिकांच्या आरोग्याला कवटाळण्याचा आणि जीवाशी खेळण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडण्याकरीता अंतत: सदर निगडित नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता मानवाधिकार सहायता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरण कार्यालय गाठले.सदर बाब अशी की,शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा योग्य रीतीने काम करीत नसून सद्यपरिस्थितीत नागरिकांच्या सोई सुविधेचा विचार लक्षात घेता पावसाळा अगोदर कार्यालयामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन करणे अपेक्षित होते.परंतु शहरातील बऱ्याच परिसरात पाणी पुरवठा होतच नाही तर काही ठिकाणची पाईप लाईन नाल्यांमधून असल्याकारणाने आणि ती टीचल्याने तर शहरात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत नसेल ना? पाणी पुरवठा कार्यालयाच्या अभियंत्यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा कायदा सुव्यवस्था संबंधित कार्यालयाची यंत्रणा फोल तर ठरत नाही ना? की पाईप लाईन मध्ये काही घोळ आहे? अश्या अनेक प्रश्नांची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.त्यामुळे शहरातील पाईप लाईन दुरुस्ती करण्यासाठी मानवाधिकार सहायता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरण कार्यालय गाठून अभियंत्यांना ८ दिवसाचा कालावधी दिला.जर शहरातील नागरिकांना ८ दिवसांत साफ पाणी पुरवठा न झाल्यास प्राधिकरण कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन देतेवेळी मानवाधिकार सहायता संघाचे प्रमुख सुनिल माकोडे,तालुका प्रमुख महेंद्र भगत, उपाध्यक्ष पंकज हिरुळकर,महासचिव सचिन इंगळे,श्रीकांत नाथे,श्रीकांत धुमाळे आदी पदाधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता यांना सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंत्यांना विविध सामाजिक संघटना,पक्ष यांनी अनियमित तसेच दुषित,दुर्गंधी युक्त पाणी पुरवठ्या बाबत वारंवार सूचना तसेच तक्रारी केल्या तरीही प्राधिकरण अभियंता यांनी आज पर्यंत कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत,मानवाधिकार सहायता संघाच्या वतीने त्यांना आठ दिवसाचा इशारा दिला असून येत्या आठ दिवसांत स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
सुनिल माकोडे
शहर अध्यक्ष
मानवाधिकार सहायता संघ,अंजनगाव सुर्जी…