दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे: आजकालच्या काळामध्ये नोकरीच्या शोधात न पडता स्वतःच्या व्यवसायाकडे वळले पाहिजे तरच आपण आपली प्रगती करण्यास यशस्वी होणार आहे, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केले.
काल ते भोसरी येथील इंद्रायणी नगर शेजारी लोकांच्या सेवेसाठी सुरेश कस्पटे व डॉ. रमाकांत कस्पटे यांनी सुरू केलेल्या मल्हार अमृततुल्य चहा या व्यवसायाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवा उद्योजक मयूर शेठ लांडे पाटील, डॉ.चंद्रकांत पाटील, सुरेश शेठ कस्पटे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे, जनरल कामगार संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्निल मदनकर त्याचबरोबर आदी मान्यवर व चहा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
