दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा, शाम पुणेकर.
पुणे: नुकताच नवीन कात्रज बोगद्याच्या पुढे चार चाकी गाडीचा अपघात झाला. त्यात टाटा नेक्सनची एक कार तेथील गटारात अपघातग्रस्त होवून पडली. तेव्हा नवीन कात्रज बोगद्याच्या चेक पोस्ट वर रात्रपाळीला असणारे पोलीस अंमलदार भोईर आणि हवालदार पुजारी यांनी त्या गाडीतील जखमींना ताबडतोब बाहेर काढून त्यांची सुटका केली.
पुणे जिल्हात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. नवले पूल ते कात्रज बोगदा आणि जांभूळवाडी दरीपूल येथून अती वेगाने वहाने धावत असतात. त्यामुळे तेथे हमखास अपघात होतात. ही दोन्ही ठिकाणे आता अपघाताचा हाॅटस्पाॅट बनली आहेत.
हे अपघात कधी थांबतील आणि वाहतूक सुरक्षित कधी होईल याची लोकांना चिंता लागून राहिली आहे.
मध्यंतरी याबाबतीत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कठोर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाला कडक सूचना केल्या होत्या.
