दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधि उमरगा
शिवराज पाटील
लोहारा:-उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या धाराशिव जिल्हा संघटकपदी दिपक जवळगे यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या सामना मुखपत्रात निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे . निवड झाल्याचे कळताच लोहारा उमरगा तालुक्यात कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले आहे.त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर अधिक जोर दिला आहे.गेली वर्षभर त्यांनी कार्यकर्त्यांचा बैठका घेत मते जाणून घेतली.दीर्घ कालावधीनंतर जिल्हा,तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. दि.५ जून बुधवारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून अधिकृत निवडी जाहीर केल्या आहेत.धाराशिव जिल्हा संघटक पदी मा दिपक जवळगे यांची निवड करण्यात आली.एकनिष्ठतेचे मिळाले फळ:-पक्ष फुटीनंतर तालुक्यात शिवसेना दुभंगली गेली.अनेक शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले.परंतु उद्धव ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा व मा खा ओमराजे निंबाळकर व मा आ कैलास पाटील यांचा विश्वास दिपक जवळगे यांच्यावर होता.पडत्या काळात साथ देणे हे मातोश्री च्या लक्षात आले शिवसेनेशी एकनिष्ठ राहात कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली.आता अधिकृतपणे शिवसेना जिल्हासंघटकपदीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात दीपक जवळगे यांना त्यांच्या एकनिष्ठतेच फळ मिळाल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
