
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे तानाजी गुंजाळ व पत्नी सौ.जयश्री गुंजाळ यांना कन्यारत्न प्राप्त झाले.तनाजी गुंजाळ हे स्वतःच्या कौटुंबिक कार्यक्रमातून नेहमीच सरकारच्या ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाला चालना देण्याचा प्रयत्न करत असतात.त्यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्ष लागवड करून केले.या वृक्षांची लागवड साकारून समाजाला मुलीचा सन्मान करण्याचा अनोखा संदेश दिला.वृक्ष लागवडीमध्ये नारळाचे झाडे उपजिल्हा रुग्णालय परिसरात मा.वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्ही.डी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद मोरे यांच्यासह पठाण अमर,काशिद मेजर, अनिल भोसले, मिलिंद बनसोडे,व गुंजाळ परिवार यांनी वृक्षलागवड करुन मुलीच्या जन्माचे स्वागत केले.