
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे
जालना /मंठा गतवर्षी मे महिन्यातच बळीराजाने मशागतीचे कामे आटोपली होती आणि जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरीही लावली होती. यंदाही बी बियाणे, खत साठवणूक करून ठेवले होते.
मात्र, पावसाने दगा दिला. त्यामुळे पेरणी खोळंबली होती. तीन दिवसांपासून मात्र मंठा परिसरातील मागील दोन तीन दिवस उकाडा वाढला होता. पाऊस येईल असे अंदाज वाटत असताच बऱ्याच भागात पाऊस बरसला. त्यामुळे आता पेरणीला वेग आला आहे.कपाशीची लागवड करण्यासाठी लगबग सुरू आहे. पेरणीच्या कामाला सुरुवात झाल्याने मजुरांना रोजगार मिळू लागला आहे.
मंठा परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस,स्वायाबिन पिके घेतली जाते. मागील वर्षी जून महिन्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सलग पावसामुळे वेळा काही बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे बळीराजाने या वर्षी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातच मशागत आटोपली. खत, बी बियाणे खरेदीकेली.
मात्र, जून महिना संपला जुलै आला तरी पाऊस काही बरसला नाही. त्यामुळे बळीराजाची धाकधूक वाढली होती. अशातच मागील दोन दिवसांपासून तळणी, वझर सरकटे, जयपूर, ढोकसाळ, खोराड सावंगी,केंधळी, पाटोदा परिसरातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पेरणीला वेग आला असून, कापूस लागवड साठी बळीराजाची लगबग सुरू आहे. शेतकामांना सुरुवात झाल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांनाही आता रोजगार मिळू लागला आहे..