
कंत्राटदाराने पुलाचे काम अर्धवट केल्याने गावकरी हैराण !
ये-जा करण्यासाठी होतोय त्रास काम पूर्ण करण्याची मागणी दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे
जालना मंठा तालुक्यातील जयपूर ते केहाळ वडगाव रस्त्याचे काम जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहे.केहाळ ज.न. प. तांड्या जवळील रोडच्या बांधकामात पुल बनविण्यासाठी निकृष्ट साहित्य वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते होते पुल बनविताना सिमेंट काँक्रीट न करता पायल्या मातीत तर वरुन मुरूम सिमेंट टाकण्यात आले बाजूच्या भिंती निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर आणि भिंतीवर पाणि न मारल्याने भिंतीला भेगा पडल्या आहे त्यावर दागडूज़ी मुरूम टाकून राहादारीस खुला केला आहे कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सुमार काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आता येथील जयपूर -केहाळ वडगाव रोडचे बांधकाम मागील गत वर्षापासून सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणं वरून हे बांधकाम सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.त्यानंतर दुसऱ्या पूल तयार करण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे त्यांनी पुलाचे काम अपूर्ण केले आहे . पुलावर पुलाच्या समोरील भागाचे सिमेंटीकरण करण्याचे काम अर्धवट व तिसराऱ्या पुलाच्या कामासाठी पावसाळ्यात खड्डे खोदून ठेवल्याने व पायल्या आणून शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यावर टाकल्याने पुलावर पाणि साचत आहे आता पेरणीचा हंगाम सरू आहे शेतकऱ्यांना शेतात बैलगाडी ट्रॅक्टर जाण्या येण्यासाठी व तालुक्याला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला झालेल्या पुलावर पुलाच्या पुढील व मागील रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी मुरूम परसविण्यात आली. परंतु, सदर कामावर गिट्टी सिमेंटीकरणाचे काम न करता कंत्राटदार अर्धवट काम सोडून गेला का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विद्यार्थ्यांना, नागरिकांना व शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून या पुलावरून ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्यातीन दिवसापासुन या परिसरात संततधार पाऊस पडल्यामुळे पुलाजवळील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे सबंधित विभागाने या कमाकडे लक्ष्य देऊन काम पुर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.क्रॅक झालेल्या पुलाच्या कामाची लवकर दुरुस्ती नवीन भिंती बांधण्यास सांगितले आहे तोपर्यंत देयक अदा करण्यात येणार नाही सांगितले आहे. दोन तीन दिवसात पुलाचे काम चालू होईल कंत्राटदारास काम चालु करण्याच्या सूचना दिल्या आहे… बी. बी. निवारे
(उप अभियंता सा.बां. मंठा )