दै.चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि .05 जुलै नवी सांगवी पुणे
नव्या सांगवीतील साई चौकातील, श्रीनिवास सोसायटीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला महावितरणने रोहित्र बसवले आहे, आणि कांकरीया गँसगोडावुन शेजारी असलेल्या गेल्या तीन- चार वर्षापासून नागरिक रोहित्राला तुटलेले दरवाजे बसवण्याची मागणी करत आहेत , परंतु नागरिकांचा जीव गेल्यावरच महावितरणला जाग येईल का? असा संतप्त सवाल मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष
आण्णा जोगदंड निवेदन देतांना केला आहे.
येताना जाताना आजूबाजूचे काही नागरिक त्या ठिकाणी कचराही टाकतात , सोसायटीतील जागरूक नागरिक संजय चव्हाण यांनी आरोग्य विभागास कळवून रोहीत्राच्या आतील परिसर स्वच्छ करून घेतला , वारंवार फोन करूनही रोहित्राला एका बाजूने संरक्षक कुंपण बसवले जात नाही. त्या ठिकाणी मोकाट जनावर लहान मुले ही नेहमी जात असतात. त्यांच्या जिवाला ही धोका निर्माण झाला आहे. जर भविष्यात काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी महावितरणच जबाबदार असेल असे जोगदंड यांनी सांगवीतील अभियंते रत्नदिप काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नव्या सांगतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे रोहित्रअसून समोरच भाजी मंडई पण आहे, आणि बस थांबा असल्याने रात्री मद्यपी मद्यप्राशन करून आतमध्ये बाटल्या ही टाकतात रोहीत्रासाठी बसवलेला दरवाजा तुटलेला आहे. दिवस भर पावसाची संततधार असते त्यामुळे आधिकच धोकादायक वाटते याची महावितरण ने त्वरित दखल घेऊन भविष्यात होणारी मानवी हानी, वित्तहानी होऊ नये म्हणून त्वरित रोहित्राला संरक्षक कुंपण व तुटलेले दरवाजे बसवावेत आणि आतिल निरूपयोगी लाईट डी.पी. काढावी. यामुळे रोहित्राच्या बाजूला कचराही कोणी टाकणार नाही आणि मद्यपी बाटल्या ही फेकणार नाहीत आणि होणारी दुर्घटना टळेल.
निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजवणे, संगिता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी यांच्या सहया आहेत.
