
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य प्रत्येकी ५ ब्रास वाळू देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, नपाचे प्रभारी मुख्याधिकारी विजयकुमार पाटे यांना निवेदनाद्वारे राहुल लोहबंदे मित्रमंडळ व आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातील मौ. शेवाळा ता. देगलुर व मौ. येसगी ता. बिलोली येथे वाळू डेपो तयार करण्यात आलेले आहेत. या वाळू डेपोतून मुखेड नगर परिषद व तालुक्यातील ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य ५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्याची मागणी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे व आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांनी केली. यावेळी सुरेंद्र भद्रे, तन्जीम ए इन्साफचे मुखेड प्रभारी हसनोद्दीन शेख, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलावरसाब जाहूरकर, अदनान पाशा, आशितोष कांबळे, अनिल बनसोडे यांची उपस्थिती होती. निवेदनाची दखल घेत तहसीलदार राजेश जाधव यांनी तात्काळ गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून घरकूल लाभार्थ्यांची यादी विनाविलंब सादर करण्याचे आदेश दिले…