युवानेते विक्रांत दादा शिंदे यांची राहणार प्रमुख उपस्थिती
गोविंद पवार उपसंपादक नांदेड…
लोहा –कंधार मतदार संघात शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ११ जुलै २०२३ पासून शेकापच्या वतीने युवा जोडो अभियान राबविणार असल्याची माहिती शेकापचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर यांनी दिली.
लोहा मतदार संघात शेकापचे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी शेकापचे लोहा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे व शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांचे हात मजबुत करण्यासाठी त्यांचे ध्येय धोरण लोहा मतदार संघातील घरघरात पोहचविण्यासाठी व लोहा मतदार संघात युवकांची फळी निर्माण करण्यासाठी लोहा तालुक्यात प्रत्येक गावात शेकाप युवा शाखा स्थापन करून दि. ११ जुलै २०२३ पासून शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा जोडो अभियान राबविणार असुन त्यांची सुरुवात माळाकोळी सर्कल पासून करणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर यांनी दिली…
