
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली :न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व अधिकारी असे तब्बल 600 कामगारांनी आपल्या न्याय व हक्कासाठी दहा मागण्या मान्य व्हाव्यात, म्हणून बेमुदत काम बंद आंदोलन चालू केले आहे.आज आंदोलनचा ९ वा दिवस आहे.
परंतु विद्यमान लोकप्रतिनिधी, चेअरमन यांना कामगारांचे काही देणे घेणे पडलेले नाही.
कामगार वर्ग दहा महिन्यापासून पगार नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.
स्वतःच्या ना कर्तृत्वामुळे संस्था डबघाईला आली, आणि कामगारांना उघड्यावर पाडण्याचे काम केले.
जयेश शिंदे यांनी भेट घेतली व कामगारांना येणाऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सहकार मंत्री अतुल सावे साहेब, कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब यांच्या माध्यमातून या कामगारांचे शिष्टमंडळ मुंबईला घेऊन जाऊन मदत करण्या संदर्भात आश्वासित केले.
कारखाना प्रशासनाने हे लक्षात घेतले पाहिजे की, कामगार वर्ग आपल्याकडे केलेल्या कामाचे दाम मागत आहे.
आपण आजही त्या माय माऊली कामगारांना अडचणीत आणून अरेरावीची भाषा करून, त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे महापाप आपण करत आहात.
एवढ्या वर्षे त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे साथ देऊन कारखाना नावारूपाला आणण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे.
त्यामुळे तुम्ही कुठलेही मेहरबानी अथवा उपकार त्यांच्यावरती करत नाहीत.
“कामगार एकजुटीचा विजय असो” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कारखाना प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे कामगारांनी सांगितलेली स्वतःची आर्थिक परिस्थिती ऐकताना मन हेलावून गेले.
यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी प्रमुख पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
त्यामध्ये शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तालुकाउपाध्यक्ष भाजपा राजाभाऊ मांढरे, वाहतूक आघाडी अध्यक्ष आप्पाराव काळे, सरपंच आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्रतात्या दोरगे, युवा वॉरियर्स जिल्हाध्यक्ष सुरज चव्हाण, पारोडी शिवतक्रार महाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच बापूसाहेब येळे, उरळगाव सोसायटी माजी चेअरमन सागर कोळपे, गुनाट उपसरपंच गोरक्ष धुमाळ, माजी उपसरपंच अनिल भालेराव,
मा. उपसरपंच पांडुरंग गव्हाणे, सदस्य लालाशेठ येळे, सदस्य तेजस भगत, गणेश कवितके, रामदास काकडे, गणेश महाराज डोंगरे, युवा कार्यकर्ते दत्ता गाडे आदी मान्यवर उपस्थित होते…