
स्थानिकच्या खासदारासह जनतेने हि फिरवली पाठ…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा तहसील कार्यालयात ८ रोजी टंचाई स्थिती व विकास कामे आढावा बैठकीचे आयोजन खासदार सुधाकर श्रंगारे व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पण बैठकीची माहिती खा. श्रंगारे यांना नसल्याने ते बैठकीस अनुपस्थित राहिले. याची चर्चा बैठकीत सुरू होती. या बैठकीला प्रमुख उपस्थित म्हणून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर उपस्थित होते.
तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये झालेल्या टंचाई स्थिती व विकास आढावा बैठकीत नांदेडचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग निहाय कामाचा आढावा घेतला तर यामध्ये जनता दरबार , महावितरण कृषि विभाग , सह अन्य तक्रारीचा आढावा घेतला प्रशासनातील मरगळ दुर करून जनतेच्या आडी अडचणी सोडवाव्यात आशा सुचना खा चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, भाजप तालुकाध्यक्ष आनंदराव शिंदे, मा. सभापती शंकर पाटील ढगे, माजी उपनगराध्यक्ष केशवराव म कदम, छत्रपती धुतमल, मा. गटनेते करिम शेख, मा. उपसभापती नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, लक्ष्मण बोडके, नगरसेवक भास्कर पाटील
पवार, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कृषी अधिकारी सदानंद पोटपलेवार पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे, उपविभागीय अभियंता मोहन पवार, गटविकास अधिकारी गोपाल कराळे अधिक उपस्थित होते.
बैठक नसुन हा कार्यकर्ता मेळावा
ही बैठक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नसुन खा. चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी घेतली आहे.. आमच्या प्रश्नच नाही. परिसरातील समस्या सोडवण्यासाठी लातुरचे खा. श्रुंगारे आहेत पण स्थानिकच्या खासदाराला फोनवरून संपर्क साधला असता मला बैठकीची माहिती नाही. मला बैठक असल्याचे कळवण्यात आले नसल्याची माहिती खा. श्रुंगारे यांनी आष्टूरचे उपसरपंच बाबासाहेब बाबर यांना दिली. ही टंचाई स्थिती व विकास कामे आढावा बैठक नसुन कार्यकर्ता मेळावा असल्याचा आरोप बाबर यांनी केला.
या टंचाई स्थिती व विकास कामे आढावा बैठकीला तालुक्यातील जनतेनेही पाठ फिरवली. गोडाऊनमध्ये ही बैठक सुरु असताना खुर्च्या मात्र रिकाम्याच होत्या. या बैठकीला तालुक्यातील जनतेपेक्षा भाजपचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी जास्त प्रमाणात उपस्थित होते…