
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते व बळीराजा अडचणीत सापडतो. आशा वेळी शेतकर्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणुन सरकारच्या वतीने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली. यापुर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांना भरावी लागत होती. परंतु , यावर्षी एक रूपयात पिकविमा काढुन मिळणार आहे. त्यामुळे लोहा कंधार तालुक्यातील शेतकर्यांनी मुदतीपुर्वी पिकविमा काढुन घ्यावा, असे आव्हान लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी केले आहे.
लोहा कंधार मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी मन्याड सुर्योदय फाउंडेशनच्या वतीने मोफत पीकविमा भरणार असल्याची माहिती एकनाथ दादा पवार यांनी दिली.
लोहा तालुक्यात तहसील कार्यालयासमोर शेषसाई ऑनलाइन , गुरूकृपा ऑनलाइन , तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सादिक मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी आयोजन केले असुन कंधार शहरासह माळाकोळी मध्ये सध्या शेतकऱ्यांना मोफत पिकाविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शेतकरी , बेरोजगार , व्यापारी , मजुदारासह , सर्वाच्या आडी अडचणी हक्कासाठी मन्याड सुर्योदय फाउंडेशन लोहा – कंधार मतदारसंघात अहोरात्र काम करणार असल्याची माहिती मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील मोरे यांनी दिली…