
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-आपल्या हिन्दू धर्मात स्त्रीयांना देवीच्या स्वरूपात पाहिले जाते. शुभ कार्यात सर्वात प्रथम महिलांना स्थान दिले जाते. जेंव्हा एक स्त्री सक्षम राहते तर ते कुटुंब, तो समाज आणि तो धर्म सुद्धा सक्षम राहतो.त्यासाठी स्त्रीशक्तीला आणखी सक्षम बनवून त्यांना आत्मसुरक्षा व धर्मसुरक्षेच्या मार्गाने धर्मकार्यात यावे साठी दुर्गावहिनी व मातृशक्ती तर्फे वयोमर्यादा ७ ते ५० वर्षापर्यंत च्या मुली व महिलांना निशुल्क कराटे व लाठी-काठी प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.
आपण आता नेहमी बातम्या मध्ये बघत असतो आणि बातमी पेपर मध्ये नेहमी वाचत असतो लव जिहाद विषयी त्याच लव जिहाद ने आज सम्पूर्ण भारता मध्ये फना वर काढलेला आहे. लव जिहाद मार्फत हिन्दू धर्मावर आघात करण्याचे षडयंत्र चालू आहे.हिन्दू मुलींना प्रेमाच्या जाळ्यांत फसवून त्यांच्या डोक्यात हिन्दू धर्मा विषयी व त्यांच्या कुटुंबाविषयी एवढे तेढ निर्माण केले जाते कि ते ज्या धर्मा मध्ये जन्मले असतात आणि ज्या कुटुंबात जन्मले असतात त्याच कुटुंबा व धर्मा विषयी वेडे वाकडे बोलत असतात.प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मातंरण केले जाते आणि शेवट हा मृत्यू मध्ये होतो . अशा लव जिहाद वर आळा घालण्यासाठी दुर्गा वाहिनी व मातृशक्ती ने एक पाऊल उचलेले आहे ते मनजे स्त्री शक्तिना आत्मसुरक्षा व धर्मसंस्कार देऊन धर्म सुरक्षासाठी सक्षम बनवण्यासाठी वयोमर्यादा ७ ते ५०वर्षापर्यंत च्या मुली व महिलांना निशुल्क कराटे व लाठी-काठी प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आले आहेत.दि.८ जुलै २०२३ रोजी ह्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ झालेला आहे.हा प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी व रविवारी सायं ५ ते ७ दरम्यान संत ज्ञानेश्वर मंदिर विणकर कॉलनी, चौफाळा येथे भरणार आहे. हा प्रथम वर्ग चालू करण्यात आलेला आहे दुर्गावाहिनी व मातृशक्ती तर्फे आता प्रत्येक भागामध्ये अशे कराटे व लाठी – काठी प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात येणार आहेत.
हा प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका पुजाताई बिसेन,मातृशक्ती जिल्हा प्रमुख मालाताई शर्मा, मातृशक्ती जिल्हा सतसंग प्रमुख संध्याताई छापरवाल यांनी परिश्रम केले व यशस्वी करण्यासाठी जयश्री उमेश कोकुलवार, वर्षा देवानंद लहाने यांनी मेहनत घेतली.ह्या प्रशिक्षण वर्गाचे शिक्षक मृनल राजेशसिंघ कपूर, हर्षल राजेशसिंग कपूर,प्रकाश आडणे, श्रेयस यादव, मनीकांत चव्हाण यांनी सहकार्य केले.ह्या प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी संजीवनीताई देशपांडे मातृशक्ती प्रांत प्रमुख,द्रोपदीताई गायकवाड प्रांत संयोजिका दुर्गावाहिनी, विद्याताई सोनूने जिल्हा संयोजिका,ऍड. आरती भूतडा,आर्ट ऑफ लिविंग जेष्ठ शिक्षक मायादीदी भास्कर अत्रे,सौ प्रगती बालाजी निलपत्रेवार(युनायटेड पद्मशाली संगम नांदेड, जिल्हाध्यक्ष अटल फाउंडेशन नांदेड जिल्हाध्यक्ष), शशिकांत पाटील, श्रीराज चक्रवार, गणेश कोकुलवार,विक्रांतजी खेडकर,वैभव दरबस्तवार,ऍड. चंद्रकांतजी पत्की,अमोल कुलथिया,गुरु व्यकटेश बाबुळगावकर, घोरबंड गुरुजी इत्यादी उपस्थित होते…