
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे इंदापूर: महाराष्ट्रातील चालू असलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीला बी आर एस हा एक सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो. असे मत बी आर एस चे इंदापूर तालुका समन्वयक निवास शेळके म्हणाले, सध्या परिस्थितीमध्ये राजकीय नैतिकतेची चर्चा सुरू आहे. हुजूरेगीरी, चमचेगीरी करणारे काही चेले सोडून गेले आहेत. यामुळे जनता राजकारणाला शिव्या मोजत आहे. मागील रब्बी हंगामात मान्सून लांबल्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. सध्याचा खरीप हंगाम वाया जातो की काय या चिंतेत बळीराजा आहे. विशेषतः मराठवाडा, विर्दभ प्रांतात कोरडवाहू शेती आहे. ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी राजकीय गणिते बांधून संघर्ष सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता राजकीय पक्ष करण्यासाठी तयार नाही असे दिसत आहे.
कालपर्यंत काँग्रेसशी जवळीक असणारे दिवसाढवळ्या भाजपाच्या तंबूत दाखल होत आहेत. बीआरएस म्हणजे भारत राष्ट्र समिती मध्ये कोण प्रवेश करणारे भाजपाची ‘बी टीम’ असल्याची टीका करत आहेत असे शेळके यांनी स्पष्ट केले.
शेळके पुढे म्हणाले, आज कोणताही पक्ष बेरोजगारी, भूकमारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भाव नाही याविषयी बोलताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या, युवा पिढीच्या प्रश्नांची सोडवणूक करताना दिसत नाही. फक्त स्वतः च्या खुर्च्या वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला सक्षम पर्याय भारत राष्ट्र समितीच देवू शकते. तेलंगणा राज्यामधील शेतकऱ्यांसाठी राष्ट्र समितीचे मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, शेतमालाला बाजार भाव वाजवी मिळण्यासाठी राज्यातील मतदारांनी राष्ट्र समितीचा पर्याय निवडला तर चांगले दिवस येतील असे मत शेळके यांनी व्यक्त केले…