दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर -: देगलूर तालुक्यातील येरगी येथील चालुक्यकालीन मंदिरांचे अवशेषांचे जतन करण्यासाठी विविध उपाययोजना राबवली जात आहेत.यामध्ये चालुक्यकालीन 18 विहिरी व दोन बारवा आहेत. यापैकी एका बारवा च्या सभोवतालचे जवळपास एक हॉटेल ,दोन घरे,एक झोपडी व एक प्लॉट असे एकूण पाच मालमत्ता धारकांनी गावच्या विकासासठी स्वयंस्फूर्तपणे अतिक्रमण काढून एक आदर्श स्थापित केले.
गावचे सरपंच संतोष पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि स्वखर्चाने प्राचीन मंदिरांचे व बारवांचे जतन करण्यासाठी अतिक्रमण काढणे,बारवा मधील गाळ काढून स्वच्छता अभियान राबवणे,असे विविध उपाययोजना केले आहेत.यापैकी गावातील चालुक्य कालीन बारवाच्या सभोवताली असलेले अतिक्रमण काढल्या शिवाय त्याचे जीर्णोद्धार करणे शक्य नव्हते.यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि नांदेड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गर्शनाखाली संतोष पाटील यांनी अतिक्रमण काढण्यासाठी त्या संबंधित नागरिकांना आवाहन केले असता त्या नागरिकांनी स्वयंस्फूर्त पणे अतिक्रमण काढून गावच्या ऐतिहासिक घडामोडीत योगदान दिले.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच चालुक्यकालीन नगरी येरगीचे कायापालट होत असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले.
स्वयंस्फूर्तपने अतिक्रमण काढणाऱ्या नागनाथ गंटावार,माधव डूमने,उत्तम बरसमवार,इरशेट्टी गंटावार,बसवंत चेंडके या पाच नागरिकांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे,अशोक बरसमवार,सुरेश सोमावार,पुंडलिक वाघमारे, तंटा मुक्ती अध्यक्ष गंगाधर बरसमवार,बसवंत पाटील, शंकर वाघमारे,मारोती कालीगवार,सुभाष कालिंगवार,हणमंत पाटील,गणपत इज्जलवार,गजानन भोकसखेडे,गजानन पाटील,मारोती बरसमवार,परमेश्वर सूर्यवंशी,अशोक बागेवार,रमेश काळींगवार,शिवा कांबळे,रमेश गटावार, आदी उपस्थित होते.
