
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय
घडामोडीमुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेला राग व्यक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे या मोहिमेचे आयोजन देगलूर शहरात देखील करण्यात आले होते यात अनेक नागरिकांनी व मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. या एक सही संतापाची मोहिमेला देगलूर शहरांमध्ये नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला या मोहिमेमुळे शिंदे सरकार विषयी नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत होता त्यावेळी तालुकाध्यक्ष मनमत परबते शहराध्यक्ष चंदू शक्कमवार, चांद देगावकर, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे, माजी शहराध्यक्ष विश्वंभर कंतेवार. अझर शेख, दिगंबर जाधव, अविनाश इंगळे, हनुमंत उच्चे श्रेयस देशमुख हनेगावकर विजय देशमुख तालुका संघटक किरण उमुगे बेंबीकरआप्पा देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष व देगलूर तालुक्यातील मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.