आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकारातुन जिल्हा नियोजन समितीतुन कामाला प्रारंभ.ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त.
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी, समाधान कळम वडोद तांगडा.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील तीन विविध भागात आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकारातुन तीन सिंगल फेज रोहीञाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.त्यामुळे बराच काळ अंधारात काढलेल्या ग्रामस्थांना या कामाचा मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून अंधाराशी सामना करणाऱ्या ग्रामस्थांना आता एकदमच उजेड पहायला मिळणार असल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे चिञ या वस्तीत शनिवारी सकाळी पहावयास मिळाले. तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई मोठी व दाट लोकसंख्या असलेले गाव आहे.त्यामुळे हे गाव विविध भागात विस्तारलेले आहे.यामध्ये सास्ते वाडी,सोनुने वाडी तसेच आहेर वाडी या तीन भागातील जवळजवळ ५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना मागील अनेक वर्षापासून विजेची समस्यांला नेहमी तोंड द्यावे लागत असे.या ठिकाणी जवळपास कुठेही विजेची व्यवस्था नसल्याने येथील ग्रामस्थांनी पर्याय म्हणून जवळजवळ दिड ते दोन किलोमीटर वरुन केंबल पसरून विजेची व्यवस्था करुन घेतली आहे.माञ त्यात देखील वेळोवेळी अडचणी निर्माण होत होत्या.पावसाळ्यात तर साप व ईतर सरपटणार्या प्राण्यांची मोठी भिती येथील ग्रामस्थ व महिलांना वाटायची.विशेष म्हणजे विजेअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गती देखील खुंटल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य देखील धोक्यात आले होते.लहान मुलांना देखील विजे अभावी घरात डासांचा ञास सहन करावा लागत असत.या भागातील ग्रामस्थांना रोजच विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याने येथील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व व्यथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख यांच्याकडे मांडताच देशमुख यांनी तत्काळ आमदार संतोष दानवे यांच्याकडे पाठपुरावा करीत जिल्हा नियोजन समितीमधुन गावातील तीन वस्त्यासाठी सिंगल फेजचे तीन रोहीञ मंजुर करून घेतले.यातील पिंपळगाव करजगाव रस्त्यावरील सोनुनेवाडी येथे आठ दिवसांपूर्वी रोहीञ बसविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला व आज सास्ते वाडी येथे कामाचे उद्घाटन सोसायटी चेअरमन ताराचंद आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाल्याने या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.राञीचा कधीही उजेड न पाहणाऱ्या ग्रामस्थांना एकदमच उजेड पहायला मिळणार असल्याने येथील ग्रामस्थांनी आंनदोत्सव साजरा केला.तसेच आमच्या अंधारमय जिवनात आज खर्या अर्थाने प्रकाश पडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख,ह.भ.प.विष्णु महाराज सास्ते, भाजपा जेष्ट नेते भगवान नाना गांवडे,बाबु शेट पठाण, चतरसिंग डोभाळ ,हरिभाऊ आहेर, अजय देशमुख, विठ्ठल देशमुख, भिमराव सास्ते,ज्ञानेश्वर सास्ते,आशोकराव देशमुख,गजु देशमुख,कौतिक धांडे, रमेश सास्ते,नामदेव सास्ते,यांच्यासह या भागातील ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती…कोट…आत्मीक समाधान लाभले……मागील अनेक वर्षापासून आमच्या सोनुनेवाडीत अंधार होता. मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येत होत्या.त्त्यामुळे मुलांना देखील अभ्यासात गोडी उरली नव्हती.शिवाय ग्रामस्थांना देखील विजे अभावी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.आता आमच्या भागातील अंधार दुर होणार असल्याने आत्मीक समाधान लाभले आहे..पंडीत सोनुने.ग्रामस्थ. सोनुनेवाडी..कोट.काम केल्याचे समाधान वाटते..या भागात कायम अंधार राहत असल्यामुळे येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.त्यामुळे हा भाग प्रकाशमय करण्यासाठी आपण स्वतःहा पुढाकार घेऊन आमदार संतोष दानवे यांच्याकडे पाठपुरावा करीत गावासाठी तीन सिंगल फेज रोहीञ जिल्हा नियोजन समितीमधुन मंजूर करुन घेत शनिवारी कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली आहे.आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागल्याने जवळजवळ ५०० ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.सुभाष देशमुख.माजी जिल्हा परिषद सदस्य …फोटो ओळी….सोनुनेवाडी येथील नवीन सिंगल फेज रोहीञाचे उद्घाटन करताना क.ऊ.बा.सभापती कौतीकराव जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख , गणेश सपकाळ..
