
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- गोवंश (बैल) पशूंना एका कंन्टीनर टेंम्पो मध्ये घेऊन जात आसतानाची माहिती खबर मार्फत मिळताच अहमदपूर पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन पाच जनांविरोधात शनिवारी रोजी रात्री उशिरा पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अहमदपूर शहरातून लातूरकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक के.ए .३८. ए. ४७३८ या क्रमांकाच्या कंन्टीनर टेंम्पो बैल घेऊन निर्दयीपणे ते लातूरकडे जात असल्याची माहिती असता या माहितीवरून सदरील कंन्टीनर टेंम्पो अहमदपूर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर नांदेडकडून लातूर कडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर जप्त केला .त्यांना गंगाखेड कडून कर्नाटक कडे बाजारात विक्रीसाठी १४ बैल घेऊन जात असल्याचे चौकशी अंती समोर आले आहे. या संदर्भात अहमद शेख , सुलतान शेख (२६ वर्ष ,रा.बारूळ ता.भालकी), पांडू मन्नू खेतायक (३५ वर्ष रा.नायक तांडा, आंध्र प्रदेश), सुधाकर व्यंकटराव झोले(४८ वर्ष रा.हंडरगुळी ता.उदगीर),महमूद आली इस्माईल (७२ वर्ष रामनलो ता.बिदर ),मोइज, खाजा मैनुदिन कुरेशी(२२ वर्ष भोपणपीता जि. संगारेड्डी) यांच्यावर बेकायदेशीरपणे पशु वाहनातून, बेदरकारपणे वाहन चालविणे ,मुक्या प्राण्यांना त्रास देणे याबाबचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील पशूंची अंदाजे किंमत सात लाख रुपये व वाहतुकीचा कंन्टीनर टेंम्पो ज्याची किमत चार लाख रुपये असा एकूण ११ लाख रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. पोलीस विशाल मुंडे ए. एस. आय आलापुरे ,चा.पो.शी आरदवाड ,पो.शी व या संदर्भात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. गजानंद माने ,प्रशांत मुळे, बाळासाहेब जवळगेकर,गोविंद गुडमे ,विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे मधुकर धडे, नरेश यादव,सुदर्शन पाटील, सुरज कापडे,मारुती भोसकर, नितेश सिहाते, गोविंद केशव भोसले व अन्य गोरक्षकांनी पोलीस प्रशासनास माहिती देण्यास सहकार्य केले आहे पुढील तपास ए. एस आय सनमुकरव हे करीत आहे..