
अबंड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
राज्यांतील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये महिलांना प्रवासांत पन्नास टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे एसटी प्रवासात वाढ उत्पन्नात देखील वाढत होत आहे. त्यातच आता एसटीचे सारथ्य महिला चालकांच्या हाती सोपविण्यात येत आहे. महिला देखील सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. यापूर्वी एसटी महामंडळात महिलांनी कंडक्टर म्हणून अनेक वर्षापासून जबाबदारी सांभाळली होती. आता त्यातच एसटी सारख्या अवजड वाहनांचे सारथ्य प्रथमच महिलांच्या हाती येऊ लागले आहे. यामध्ये राज्य परिवहनांच्या सेवेत महिला चालक देखील रुजू होत असताना चांगलेच दिसून येत आहे. अशातच सातारा जिल्ह्यांतील आणि वाई तालुक्यांतील सौ. स्वाती प्रमोद इथापे या एसटी महिला चालक म्हणून सातारा जिल्ह्याच्या इतिहासांमध्ये प्रथम महिला चालक ठरल्या आहेत. सौ. शितल उर्फ स्वाती इथापे या सातारा राज्य परिवहन विभागांच्या वाई आगारांत रुजू झाल्या आहेत. त्यांनी वाई सातारा वाई विना वाहक अशी लालपरी चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. त्यांना पाहून सातारा जिल्ह्यासह वाई तालुक्यांतील प्रवासी आश्चर्यचकीत होऊन त्यांचे मनभरुन कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन देत आहेत. सातारा राज्य परिवहन विभागांच्या वाई आगारांमध्ये सौ. शितल (उर्फ स्वाती) इथापे यांच्यासह धनश्री जयसिंग खराडे, संचिता संतोष यादव यांचाही महिला एसटी चालक म्हणून समावेश झाला आहे. या तिन्हीही एसटी महिला चालक वाई आगारांत नव्यांने रुजू झाले आहेत. या तिन्हीही एसटी महिला चालकांचे सातारा जिल्ह्यांतून तसेच वाई तालुक्यांतून तसेच प्रश्न…