
अध्यक्षपदी मा नगरसेवक अनिल दाढेल तर कार्याध्यक्षपदी पञकार तुकाराम दाढेल यांची निवड
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा,साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती (१०३) महोत्सव समिती निवड संदर्भात दि. ९ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह जुना लोहा येथे सायंकाळी ८ वाजता मातंग समाज नेते मा.पांडुरंग दाढेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये सर्वानूमते लोह्यातील
साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती (१०३) महोत्सव समिती २०२३ कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात जयंती महोत्सव अध्यक्ष पदी माजी नगरसेवक अनिल भाऊ दाढेल,कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार तुकाराम दाढेल सर उपाध्यक्ष सुभाष कंधारे,सचिव कृष्णा दाभाडे,कोषाध्यक्ष बबन सरोदे,सहसचिव पुंडलिक दाढेल,सहकोषाध्यक्ष देवीचंद पिसोळे,सदस्य करण सावळे,अमोल भिसे,माधव लोंढे,चांदु भिसे, दत्ता वाघमारे, सल्लागार पदी चांदु पाटोळे,पिराजी कंधारे, नागन दाढेल, यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
सदरील बैठकीस संतराम दाढेल,पिराजी कंधारे,रवीभाऊ भालेराव,सकाराम भिसे,
सोपान कांबळे,माधव वंजारे,शिवाजी लोकडे,बाजीराव जाधव,राहुल भिसे,संदीप सावळे,नुमेश लोंढे,अनिल शिवाजी दाढेल,विजय मा.दाढेल,सुनील दाढेल,श्रावण लोंढे,साहेबराव दाढेल,श्याम दाढेल, प्रदीप दाढेल,विनोद दाढेल,गणेश दाढेल,चंद्रकांत धोंगडे,नागेश लोंढे,चंद्रकांत दाढेल,राहुल दाढेल,संदीप सावळे, लक्ष्मण गवारे,धोंडीबा पिसोळे, गजानन दाढेल आदी सह मोठ्या संख्येने नवतरुण वर्ग व समाज बांधवांनची उपस्थिती होती.
निवड झालेल्या नूतन कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक, राजकीय, मित्र परिवार अशा विविध क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.