मुख्याध्यापकाच्या संगनतमताने स्वाक्षऱ्या करून बिले उचललेली आहेत पंचायत समिती येथे पत्र पाठवून सुद्धा आणखी त्यांची चौकशी का झाली नाही नेमकं प्रशासन यांच्यावर दुर्लक्ष करत आहे का?
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:-किसान शिक्षण प्रसार मंडळ उदगीर, द्वारा या संस्थे अंतर्गत अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत . या संस्थेचे अध्यक्ष धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परिशिष्ट- अ नुसार श्री. विजयकुमार बाबाराव पाटील हे अध्यक्ष आहेत.परंतु ते एक वर्षांपूर्वी मयत झालेले आहेत .तेव्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयानुसार कुठल्याही प्रकारचे अध्यक्षाला मान्यता दिलेली नाही .त्या ठिकाणी अध्यक्षाचे सर्व कारभार उपाध्यक्ष करतात असे या संस्थेच्या घटनेनुसार असताना सुद्धा श्रीरंगराव ज्ञानोबा पाटील(संस्थेचे कोषाध्यक्ष) यांनी अध्यक्ष म्हणून स्वाक्षऱ्या करून विध्यावर्धिनी प्राथमिक विध्यालय उदगीर, विध्यावर्धिनी हायस्कूल उदगीर, महात्मा फुले प्राथमिक विध्यालय अहमदपूर , महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हंडरगुळी, शाहू विद्यालय शेळगाव, निर्मलपुरी विद्यालय हेर, जिजामाता विध्यालय तोंडचिर, नागाबुवा विध्यालय हेळंब, या विद्यालयातील मुख्याध्यापकांना विश्वसात घेऊन शालेय पोषण आहाराची देयके उदगीर पंचायत समिती ,अहमदपूर पंचायत समिती,चाकूर पंचायत समिती या कार्यालयातून उचलून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर करून संस्थेची आणि शासनाची फसवणूक केली आहे .तरी उदगीर, अहमदपूर,चाकूर या पंचायत समिती ने अद्यापही चौकशी संबंधी संबंधीत विद्यालयाच्या मुख्याध्यापकास जाब विचारणा केली नाही या पूर्ण पंचायत समिती येथे पत्र दिले आसता आणखी कशलीही चौकशी समीतीची नेमणूक झाली नाही. प्रशासन यांच्यावर दुर्लक्ष का करत आहे अहमदपूर पंचायत समिती येथे पण पत्र पाठवले असता आतापर्यंत चौकशी झाली नाही. नेमकं पत्र पाठवून सुद्धा प्रशासन का दुर्लक्ष करत आहे ? याची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या कारणास्तव संस्थेचे लाखों रुपयांचे नुकसान केलेले आहे .तरी तात्काळ यावरती चौकशी करून बोगस अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व यापुढील देयके स्थगित ठेवण्यात यावी.