
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जिल्हाध्यक्षा अश्विनीताई वंकलवार
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड बाजीराव गायकवाड
नांदेड :-अनेक दिवसांपासून कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र देण्यास उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी नांदेड जिल्हातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना आदेश द्यावेत की कोणत्याही प्रकारची अट न लावता कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र द्या अशी मागणी आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय नरसिंगभाऊ आयलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई वंकलवार यांनी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास खासदार यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन झाडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे अश्विनीताई वंकलवार यांनी दिला आहे.यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते…