
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
मंठा सुरेश ज्ञा.दवणे जालना.
मंठा तालुक्यातील जयपूर – केहाळ वडगाव रस्त्यावरील साहेब त्या पुलाच्या काम पुर्ण होणार का? कंत्राटदराने पुलाचे काम अर्धवट केल्याने गावकरी हैराण !
ये-जा करण्यासाठी होतोय त्रास, काम पूर्ण करण्याची मागणी या मथळ्याखाली दैनिक चालु वार्ताने ०७ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मंठा तालुक्यातील जयपूर -केहाळ वडगाव या रस्ताचे काम दोन वर्षांपासून सुरु झालेले आहे.पावसाळा सुरु होऊनही पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे बांधकाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याने पुलावर पाणि साचत आहे.रस्त्यावरून प्रवास करताना पेरणीच दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती साहित्य नेआन करत असताना त्रास,दररोज लहान-मोठे अपघात होत होते. शिवाय आता पावसाळा सुरू झाल्याने मोठे पाऊस होऊन खड्डात पाणी साचल्याने चारचाकी वाहणास अडथळा, दुचाकीस्वार पडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे केहाळ वडगाव, जयपूर, माळेगाव मधील नागरीकांनि यावर दैनिक चालु वार्ताने आवाज उठवावा अशी विनंती केली होती.
त्यानुसार चालु वार्ताच्या प्रिंट मिडिया व आँनलाईनच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर दै.चालु वार्ताच्या पाठपुराव्याला यश आल्याने जयपूर -केहाळ वडगाव -माळेगाव मधील नागरीकांनी दै.चालु वार्ताला धन्यवाद दिले. पावसाळ्यात या रस्तावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून जयपूर -केहाळ वडगाव रस्तावरील पुलाचे काम तात्काळ सुरू केले आहे.भविष्यात ह्या कामात काही अडचण येणार नाही-बी. बी.निवारे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंठा