
मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकित शरदचंद्रजी पवार साहेबांना पाठींबा.
दै.चालू वार्ता
भोकरदन प्रतिनिधी,समाधान कृष्णा कळम
आज दि. 09/07/2023 रोजी मा. आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांचे संपर्क कार्यालय भोकरदन येथील भोकरदन तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत राहण्याचा व शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मताने पाठींबा देऊन पक्षाच्या अडचणीच्या काळात सर्वांनी पवार साहेबांना साथ देण्याचा निर्धार करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की, रा. कॉ. पक्षात फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टी पक्षासोबत जात धर्मांध शक्तीसोबत हातमिळवणी केल्याने सर्व जाती, धर्म, शेतकरी, कष्टकरी यांना सोबत घेऊन चालणारे देशाचे ज्येष्ठ नेते तथा शेतकऱ्यांना पहिली संपूर्ण कर्जमाफि देणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी आपण उभे रहावे. असा आग्रह बैठकित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बैठकिसाठी प्रत्येक गावातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावातील एक ते दोन कार्यकर्त्यांनी गावातील सर्वसामान्य नागरीकांच्या भावना बैठकित मांडल्या. यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 135 कार्यकत्यांनी मत व्यक्त केले. बैठकित मत व्यक्त करत असतांना अनेक कार्यकर्ते भावनिक झाले होते. यावेळी मा.आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, बदनापुर मतदारसंघाचे नेते बबलुशेठ चौधरी, युवानेते सुधाकर पुंडलिकराव दानवे, तालुकाध्यक्ष रमेशशेठ सपकाळ, जिल्हाउपाध्यक्ष अशोकराव पवार, युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश जाधव, जिल्हासरचिटणीस संग्रामराजे देशमुख, आंबादास रगडे, महिला तालुकाध्यक्षा सुनिता सावंत, महिला जिल्हाउपाध्यक्षा वंदना हजारे, मा. नगरसेवक शब्बीर कुरेशी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करत असतांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीन निवडणुकांना सामोरे जाईल. व लवकरच पुढील महिण्यात आपल्या भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची लवकरच जाहिर सभा आपण घेणार आहोत. असे युवानेते सुधाकर पुंडलिकराव दानवे यांनी सांगितले. तर प्रा.डॉ. अंकुश जाधव यांनी भाषण करतांना आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निर्माण करण्याचे काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केले त्यामुळे पक्षाच्या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी पवार साहेबांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे रहावे असे आवाहन केले, तसेच बदनापुरचे नेते बबलू चौधरी यांनी देखील बदनापुर विधानसभा मतदारसंघ शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांना मानणारा असून येत्या काळात पवार साहेब या मतदारसंघात करिश्मा करतील असे सांगितले.
सर्वात शेवटी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी आपल्या तालुक्यातील मत व्यक्त केलेल्या 135 पैकी 135 कार्यकत्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार देशाला आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात आणि धर्म च अधर्माच्या कौरव पांडवांच्या लढ्यामध्ये आपण धर्माच्या बाजुने म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजुने ठामपणे उभे रहावे. असे मत व्यक्त केल्याचे सांगितले. तर आपली लढाई आपल्या पक्षातून गेलेल्या लोकांसोबत नसुन आपली लढाई आपल्या पक्षात व शिवसेनेत फुट पाडणाऱ्या भाजपासोबत असल्याचे मा. आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी सांगितले. यावेळी बदनापुरचे राम सिरसाट, नगरसेवक अब्दुल कदिर बापु, निर्मला भिसे, कांताताई वाघमारे, कोल्हे ताई, शहराध्यक्ष नईम कादरी, शब्बीर कुरेशी, अजहर शहा, अनिल गावंडे, शमिम मिर्झा, रामदास रोडे, डि.डि.पाटील गोरे, पंढरिनाथ पवार, मंगेश जाधव, डॉ. शालीकराम सपकाळ, गजु देशपांडे, रावसाहेब दाभाडे, पंडीतराव इंगळे, रामशेठ बावस्कर, जनार्धन जाधव, रामेश्वर जंजाळ, साहेबराव दसपुते, बालाजी जगताप चेअरमन, रहेमान शेख, अरुन पैठणे, सत्तार बागवान, मुजिब हाजी, जयराम मुठ्ठे, बी.एन.शेठ कड, प्रल्हाद गोरे, भिमराव भिसे, के.डी. दांडगे, बळीराम ठाले, रमेश आहेर, इरुफान पटेल, डॉ. सलीम शेख, आखे पाटील, बालुशेठ जगताप, पंडीतराव आगलावे, वर्धमानशेठ वास्कर, रमेश बरडे, मुमताज मदनी, ईश्वर पांडे, उखाजी कोरडे, मंजितराव पांडव, सांरंगधर भोंबे, कृष्णा मिसाळ, सारंगधर जामुंदे, दत्ता, पुंगळे, विजय मिरकर सरपंच, फैसल चाऊस, अंगद सहाणे, पुंजाराम साबळे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…