
निराशेत बदलण्याची वेळ…
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर बीड गेवराई उमापुर
उमापूर मधील सर्वत्र पेरणी सुरु असून, पावसाने अचानक आपली दिशा बदलल्याने उमापूर मध्ये बहुतांश भागात पाऊसच नाही,
खूप कमी पाऊस व तुरळक ठिकाणी पडणारा हा पाऊस आता पेरणी होऊन बियाणे ऊगवण्याच्या वेळेस
पाऊस थांबला असून, आता सर्वत्र पेरलेले बी उगवतात की नाही,
असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थितत झाला असून, आता पुढे काय करायचे.
पावसाळा सुरू होऊन अवघे 35,40 दिवस होऊन गेले.
उमापूर परिसरात आणखीही जोरदार पावसाची हजेरी झाली नसून, शेतकरी आता आताशी आलेला पीक
वाया जाईल का अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात चालली असून,
एवढ्या महागाचं बी बियाणं पेरून
लागण करून, आता पावसाने अशी दडि मारली असता उगवलेलं पीक
हि पावसाविना जळून जाते की काय
शेतकऱ्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली .
कापसाची लागवड होऊन पाऊस असा अखडला, आता जोरात वारे वाहू लागले असून, पाऊस येईल की नाही अशी शंका निर्माण होत आहे.
सध्या परिस्थितीत लागवडी पूर्ण
झाल्या असून, आता आतुरतेने पावसाची वाट पहावी लागते,
आणखी चार-पाच दिवसात जर पाऊस आला नाही, तर शेतकरी बळीराजा बेहाल झाल्याशिवाय राहणार नाही.
बहुतांश क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून असून (कोरडवाहू) बागायती क्षेत्राचे पण हेच हाल होतील, असे बळीराजा कडून सांगण्यात येते, सध्याची परिस्थिती खूप गंभीर असून,
शेतकरी आता अहवाल दिल झाला आहे…