
जालना प्रतिनिधी.
आकाश माने..
आता आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंकिंग अतिशय महत्वाचे झाले आहे . त्यामुळे जर तुम्ही जर अद्यापही पॅन कार्ड आधाराशी संलग्न केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे तुम्ही तुमची अनेक प्रकारची आर्थिक कामे करु शकणार नाहीत. त्यात अनेक कामे आहेत. मात्र आपल्या आयुष्याशी निगडित प्रामुख्याने १५ अशी कामे आहेत की,हि कामे आधार आणि पॅन संलग्न नसेल तर हि कामे होणार नाहीत. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंकिंग करून घ्या.
सरकारने करदात्यांच्या आर्थिक माहितीची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड अस्तित्वात आणले. त्यात प्रामुख्याने गुंतवणूक, कर्ज आणि व्यावसायिक घडामोडी यांच्यातील करचुकवेपणा शोधण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळे ३० जूननंतरही पॅन आधारकार्डाशी लिंक केले नसेल तर अनेक आर्थिक व्यवहारांवर गदा येण्याची शक्यता आहे पाहू नेमकी हि १५ कामे कोणती आहेत.
१. सहकारी बँकांपासून खाजगी बँकांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बँकेत खाते उघडणे.
२.क्रेडिट आणि डेबिट कार्ड तयार करण्यात अक्षम.
३. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते उघडण्यास अडचणी.
४. परदेश प्रवासासाठी एका वेळेचे भाडे ५० हजार रुपये भरावे लागेल.
५. एकल व्यवहारात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करण्यावर निर्बंध
६. म्युच्युअल फंडात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम गुंतवण्यावर निर्बंध
७. कोणत्याही संस्थेला ५० हजारांपेक्षा रक्कम देता येणार नाही.
. आरबीआयकडून केवळ ५० हजार रुपयांपर्यंत बाँन्ड्स खरेदी करता येणार.
९. कोणत्याही मुदत ठेव अथवा बँक योजनेत वार्षिक ५ लाख रुपये गुंतवणूकीवर मर्यादा
१०. बँक ड्राफ्ट, पे ऑर्डर किंवा चेकसाठी ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम भरण्यावर मर्यादा
११. आर्थिक वर्षात जीवन विमा कंपनीला प्रीमियम म्हणून ५० हजार रुपयांपर्यंतच पेमेंट करता येणार
१२. अंदाजे १ लाख रुपयांपर्यंतच्या शेअर व्यवहारांवर बंदी
१३. निष्क्रिय पॅन वापरून केलेल्या पेमेंटवर कर कपात.
१४. मोटार वाहने किंवा दुचाकी वाहने वगळून वाहनाची विक्री किंवा खरेदी.
१५, अंदाजे २ लाख रुपयांच्या उच्च किंमतींच्या वस्तू खरेदी आणि विक्रीवर अधिक कर
त्यामुळे लवकरात लवकर आपले आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागणार नाही . आणि आपले आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील आपल्याला यानंतर आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत .