
अल्पभूधारक शेतकरी अंकुश तांगडे यांचे मोठे नुकसान…
दैनिक चालू वार्ता .
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम.वडोद तांगडा
भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथिल रहाणारे अल्पभूधारक शेतकरी अंकुश पंढरीनाथ पाटील तांगडे यांची वालसावंगी शिवारात जमिन आसून त्यांच्या शेतात त्यांनी जनावरांसाठी गोठा बांधला आहे.यामध्ये त्यांनी शेळ्या बांधलेल्या आसता,रात्री अचानक लांडग्यांने सोमवारी रात्री हल्ला करून 4/6 शेळ्या जिवंत ठार केल्या आहेत.ही घटना दिनांक 10 जुलै रोजी उघडकीस आली आहेत .सदरील घटनेची माहिती लक्षात घेतास,अंकुश पंढरीनाथ तांगडे यांनी पशुवैद्यकिय आधिकारी यांना तातडीने माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी सहाने साहेब ,तसेच मिसाळ यांच्या सहकार्याने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आसून त्यामधे शेतकरी अंकुश पंढरीनाथ तांगडे यांचे 30 ते 40हजाराचे नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने अंकुश तांगडे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहेत…