
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: १४ जुलै २०२३ रोजी देगलूर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्याचे भगीरथ माजी केंद्रीय गृहमंत्री मा. मुख्यमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०३ व्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर बंडय्या मठ देगलूर येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी रक्तदात्यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यावेळी १५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या महारक्तदान शिबिराला हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले त्यावेळी शिबीराला देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेशअंतापूरकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बिरदार, बळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रितम देशमुख, माजी सभापती रामराव नाईक, प्रशांत पाटील आचेगावकर, बसवराज पाटील वल्लाळीकर ताराकांत पाटील नरंगलकर बालाजी थडके पाटील, जनार्धन बिरादार शंकर कंत्तेवार, धोंडीबा (मिस्त्री) कांबळे, सौ. नंदाताई देशमुख, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.