
दैनिक चालू असताना नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे…
कै. तान्याबाई तुकाराम मिरकुटे सार्वजनिक वाचनालय दाताळा ता.कंधार जि.नांदेड यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा दाताळा येथे ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक वाचक दिवस साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. भाग्यश्री संजय फुलवळे व प्रमुख पाहुणे श्री विठ्ठल राव आंबटवाड सेवानिवृत्त ग्रंथपाल तंत्रनिकेतन नांदेड श्री जीवनराव शिंदे सेवानिवृत्त ग्रंथपाल तंत्रनिकेतन नांदेड श्री संभाजीराव फुलवळे सेवानिव्रत कृषी अधिकारी शिक्षण समिती अध्यक्ष श्री शेषराव पाटील शिंदे श्री नारायण पवार हे होते
या कार्यक्रमासाठी पवळे सर डाकोरे सर चनावार सर दासरे सर कराड सर पांचाळ सर पाटील सर आणि मॅडम सर्व यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रंथपाल शंकर विठ्ठल मिरकुटे व गावकरी उपस्थित होते
यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन त्याचे वाचन केले या पुस्तक प्रदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा गगनात मावेन असा होता
गावातील सुज्ञ पालकांनी या कार्यक्रमाचे मन भरून कौतुक करत ग्रंथालयाचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचेआभार मानले…