दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा जिल्हा परिषदअंतर्गत महिला व बालविकास विभागात अंगणवाडी मदतनिसांची तब्बल २७ पदे भरली जाणार आहेत. यासाठी शेकडोअर्ज आले असून, बारावी उत्तीर्णची पात्रता असताना त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अंगणवाडी मदतनीस म्हटले म्हणजे त्यांच्या नोकरीला गावात कोणी महत्व देत नव्हते, अशी पूर्वी स्थिती होती. आता मात्र स्पर्धेच्या युगात चित्र पलटलय. मिनी अंगणवाडी मदतनीसांच्या नोकरीसाठी आता उच्चशिक्षित विद्यार्थिनीही रांगेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागही आश्चर्यचकित झालेला आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणीही अंगणवाडीसेविकेचे काम करण्यास तयार झालेल्या आहेत. तालुक्यातील या पदांच्या भरतीसाठी शेकडो अर्ज आल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांच्या अधीनस्थ अंगणवाडी मदतनिसांची मानधन तत्त्वावर भरती करण्यात येत आहे. यासाठी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असलेल्या शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून प्रशासनाने अर्ज मागविले आहेत छाननी सुरू आहे. लवकरच निवड होणार आहे मात्र या पदासाठी अर्ज आल्याचा विचार केल्यास रोजगार मिळण्यासाठी उच्चवीभूषित उमेदवाराने अर्ज केल्याने तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण दिसून आले….अंगणवाडी मदतनीसची जबाबदारी काय..?
गावस्तरावर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यानुषंगाने अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना शिकविणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, लसीकरण अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
भरती प्रक्रिया सुरु…
तालुक्यात २७पदासाठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरु असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे
सदर भरती प्रक्रिया ही केवळ शैक्षणिक गुणांच्या आधारे होणार असून कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये,, तालुक्यात ग्रामीण प्रकल्पात एकूण २७ अंगणवाडी मदतनीस पदासाठी एकूण १३४ अर्ज प्राप्त झाले आहे
कोळेकर रमेश
बाल विकास प्रकल्प अधिकारी मंठा. ..
