
एक दिवस कोरडा पाळा..
डॉ. सचिन शेकडे तालुका आरोग्यअधिकारी मंठा…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा. सध्या पावसाळा सुरू असल्याने या दिवसात आजाराचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार खूप होतात, या दिवसांमध्ये दूषित पाण्यामुळे पसरणारे आजार हगवन, उलटी, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, टायफाईड इत्यादी जीव घेणे आजार उद्भवतात. त्याचप्रमाणे साचलेले पाणी तसेच घरगुती, बाहेरच्या वापरायच्या पाण्याची भांडी, टाके, माठ, रांजण, मडके व निरुपयोगी टायर, फुटके माठ, फुलदानी, कुलरच्या टाक्या यामध्ये साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन कीटकजन्य आजार त्यामुळे डेंगू, हिवताप, चिकनगुनिया, हत्तीरोग, इत्यादी जीवघेणी आजार वाढण्याचे शक्यता निर्माण असते. यासाठी डासांचा प्रादुर्भाव वाढवून तसेच दूषित पाण्याचा प्रादुर्भाव होऊन जीवित हानी होऊ नये, जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात यावी. पिण्याची पाणी ब्लिचिंग पावडर टाकलेलेच वापरावे, पिण्याचे पाणी दुहेरी कपड्याने.गाळून भरावे, ताप आल्यास पाणी उकळून थंड केलेलेच पिण्यास वापरावे, घरगुती वापरायची पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून पुसून कोरडी करून कोरडा दिवस पाळावा, निरोपयोगी टायर, फुटके माठ फुटके रांजण, प्लास्टिक ग्लास, नष्ट करावे, फुलदाणी, कुलरच्या टाक्या यामध्ये पाणी साचू देऊ नये, संडासच्या पाईपला कापड किंवा जाळी बसवावी, रात्र झोपताना पूर्ण कपडे घालून झोपावे, शक्यतो मच्छरदाण्याचा वापर करावा, घरा सभोतालच्या परिसर स्वच्छ ठेवावा, नाल्या, गटारे वाहते करावी, परिसर स्वच्छ ठेवावा. या प्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आव्हान मंठा तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन शेकडे यांनी केले आहे…